भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

एरंडोलक्राईमजळगाव

“त्या” अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले, प्रेम संबंधातून महिलेचा खून

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रातील निर्जन जंगलात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाच्या खुनाचा छडा जळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत लावला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रेम संबंधातून ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनाक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका महिलेचा विद्रूप अवस्थेतील अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीने चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनदाट जंगल व निर्जन परिसरामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र असे असताना पोलिसांनी मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची मुर्नी हे महत्त्वाचे धागेदोरे ठरले. तसेच फॉरेन्सिक तज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीच्या आधारे मृत्यूचा कालावधी ३० किंवा ३१ जानेवारीदरम्यानचा असल्याचे निश्चित केले.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. भौतिक, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, खैरागड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून आरोपीने डोक्यात प्रहार करून व ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलमधील पेट्रोल मृतदेहावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, तसेच पोलीस अंमलदार ईश्वर पाटील व विनोद पाटील यांचा कारवाईत सहभाग होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!