भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणखी एका भाजप नेत्यांचं नाव

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जसजशी विधानसभेची निवडणुक जवळ येत आहे, तसतसे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.त्या महायुतीतील मित्र पक्ष भाजप, शिंदे शिवसेना,राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीतील इतर मित्र पक्ष,महविकास आघाडीतील मित्र पक्ष कांग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट व आदी मित्र पक्ष असे सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा बाळगून आहेत.

सर्वच नेत्यांचे समर्थक आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा त्यासाठी कंबर कसत आहेत. त्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केले जात आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकावले.तर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना वाटते की, देवेंद्र फडणवीस पुन्हा मख्यामांत्री व्हावे, आता त्यातच नुकत्याच विधानपरिषदेवर निवडून आलेल्या पंकजा मुंडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचे बुलढाण्या मध्ये चक्क बॅनर झळकवले. त्या मुळे आता महायुतीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार वाढत असल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!