मुंबईतील ७ रेल्वेस्थानकांची नावं बदलणार, करी रोडचे लालबाग तर मरीन लाईन चे मुंबादेवी आणि चर्णी रोडचे….
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास परवानगीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मांडला. करी रोड, सँडहर्स्ट, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत.
ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत याआधी निर्णय घेण्यात आला होता. वेस्टर्न रेल्वे मार्गावरील करीरोड या स्टेशनचे नाव बदलून आता लालबाग करण्यात येणार आहे. सेंट्रल रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट या स्टेशनचे नाव बदलून आता डोंगरी असे करण्यात येणार आहे.
कोणत्या रेल्वे स्टेशनला कोणतं नाव दिलं जाणार?
करीरोड – लालबाग रेल्वे स्थानक
सँडहर्स्ट – डोंगरी रेल्वे स्थानक
मरीन लाईन- मुंबादेवी रेल्वे स्थानक
चर्णी रोड – गिरगाव रेल्वे स्थानक
कॉटन ग्रीन – काळाचौक रेल्वे स्थानक
डॅाकयार्ड – माझगाव रेल्वे स्थानक
किंग सर्कल- तिर्थनकर पाश्वनाथ रेल्वे स्थानक