राज्याची चिंता वाढविणारी बातमी : राज्यात दोन महिन्यात झिकाचे ८ रुग्ण
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मे महिन्यात कोल्हापूर, अहमदनगर मध्येही प्रत्येकी एक एक झिकाचा रुग्ण सापडल्याने झिकाचा प्रादुर्भाव होऊ नये या साठी राज्यातील सर्व महानगर पालिकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
जून महिन्यात आढलून आलेली सर्व रुग्ण पुण्यातील कोंढवा, एरंडवनेत येथील आहेत. झीकाचे रुग्ण सापडल्याचे राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.