भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुढचे ३ दिवस धोक्याचे, अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात पुढचे तीन दिवस राज्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

या सह पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह (प्रतितास ५०-६० किमी ) मेघगर्जना आणि मुसळधार पाऊस बरसणार आहे. विशेषतः २३, २४ आणि २५ मे रोजी ठाणे आणि मुंबईकरांना अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीवर निसर्गाचे रौद्र रूप दिसू शकतं. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘अत्यंत मुसळधार’ पावसाचा इशारा दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान विभागाने दिलं आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांमध्ये २३ मे रोजी जोरदार वाऱ्यांसह (प्रतितास ५०-६० किमी ) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वारे कायम राहतील. नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर आज आणि उद्या जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

तसेच विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये २३ मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, अमरावती, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम किंवा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाथ्यावर २३ आणि २४ मे रोजी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून मार्गावरील दरडी कोसळण्याचा धोका आहे. कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर २३ ते २५ मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्या कडून देण्यात आला आहे. काही ठिकाणी तर अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!