भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

विधानसभेतील महिलांचे संख्याबळ घटले, विधानसभेत फक्त २१ महिला पोहोचल्या

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीच्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात असून सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची लाडकी बहिण योजना सुरु केली आणि झालेल्या विधानसभेत मोठे यश महायुतीला मिळालेलं आहे.

परंतु , दुसरीकडे विधानसभेतील महिला आमदारांचे प्रमाण घटले आहे. गेल्या विधानसभेत २८८ सदस्यांमध्ये २७ महिला आमदार होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत २१ महिला निवडून आल्या आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींची विधान सभेतील संख्या या वेळी कमी झाली. या २१ महिला सदस्यांमध्ये मध्ये १० विद्यमान महिला आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या एकमेव महिला आमदार आहेत.

यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात होते. त्यात पुरुष उमेदवारांची संख्या ३७७१, तर महिला उमेदवारांची संख्या ३६३ होती. निवडणुकीत तब्बल ३ कोटी ३ लाख महिलांनी मतदानात सहभाग घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर २१ महिला आमदार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये निवडणुकीत २१ विद्यमान महिला आमदांरापैकी १० महिला पुन्हा निवडून आल्या आहेत, तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि गीता जैन या दोन महिला आमदारांचा पराभव झाला आहे. नव्या पंधराव्या विधानसभेत ११  नवीन महिला असणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटातून एकही महिला आमदार विजयी झालेल्या नाहीत.
या आहेत राज्यातील नवीन २१ महिला आमदार

भाजप
१) श्वेता महाले (चिखली)
२) मेघना बोर्डीकार (जिंतूर)
३) देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
४) सीमा हिरे (नाशिक पश्चिम)
५) मंदा म्हात्रे (बेलापूर)
६) मनीषा चौधरी (दहिसर)
७) विद्या ठाकूर (गोरेगाव)
८) माधुरी मिसळ (पर्वती)
९) मोनिका राजळे (शेवगाव)
१०) नमिता मुंदडा (केज)
११) श्रीजया चव्हाण (भोकर)
१२) सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व)
१३) स्नेहा पंडित (वसई)
१४) अनुराधा चव्हाण (फुलंब्री)

राष्ट्रवादी अजित पवार गट
१५) सुलभा खोडके (अमरावती)राष्ट्रवादी अजित पवार गट
१६) सरोज अहिरे (देवळाली) राष्ट्रवादी अजित पवार गट
१७) अदिती तटकरे (श्रीवर्धन) राष्ट्रवादी अजित पवार गट
१८) सना मलिक (अनुशक्तीनगर) राष्ट्रवादी अजित पवार गट

शिवसेना शिंदे गट.                                                      १९) मंजुळा गावित (साक्री) शिवसेना शिंदे गट
२०) संजना जाधव (कन्नड) शिवसेना शिंदे गट
कांग्रेस
२१) ज्योती गायकवाड (धारावी) काँगेस

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!