भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ डबल मर्डर प्रकरणातील संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | येथीलकाल रात्री झालेल्या गोळीबार करुन हत्या करणार्‍या संशयितांना धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिसांनी एकास तर भुसावल येथुन विनोद चावरिया अटक केली आहे.

काल शहरातील जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिराच्या समोर रात्री साडेनऊच्या सुमारास कारमधून प्रवास करणार्‍या माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने त्यांचा हल्यात मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यात अकरा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. ते आज साक्री पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या दहिवेल गावातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

या अनुषंगाने पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी आणि त्यांच्या सहकार्‍ यांच्या पथकाने, सदर हॉटेलमध्ये जाऊन झाडाझडती घेतली असता संशयित तेथून पळून गेले. मात्र त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये दुहेरी हत्याकांडातील संशयित राजू भागवत सुर्यवंशी ( वय ५५, रा. संभाजी नगर, वरणगाव रोड, भुसावळ ) यांचा समावेश आहे.

हत्याकांडातील संशयित आरोपी राजू भागवत सुर्यवंशी यांना उद्या जळगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणारं आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!