मुक्ताईनगर तालक्यात अवैध गावठी दारू भट्टीचा सुळसुळाट, मुक्ताईनगर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; माहिती देऊनही कारवाई शून्य !
मुक्ताईनगर प्रतिनिधी, अक्षय काठोके | तालुक्यात अनेक ठिकाणी हातभट्टी निर्मिती केंद्र थाटली असल्याने परिसर हातभट्टी दारू निर्मिती केंद्राचे मुख्यालय झाले असून मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे नदीकाठी अवैध गावठी दारूचा मोठा अड्डा पोलिसांच्या कृपा आशीर्वादाने चालू असून पोलिसांना माहिती देऊनही कारवाई न होणे यामागचं गुपित आर्थिक रसद असल्याचे नागरीक सांगत आहे.
तालुक्यात अवैध धंदे जोमात तर पोलिस कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, विधीमंडळात तालुक्यातील अवैध धंद्यांचा मुद्दा गाजला खरा मात्र, अवैध धंद्यांना लगाम काही लागला नाही. पोलिसांना आर्थिक सहाय्य होत असल्याने बेकायदेशील व्यवसाय करणाऱ्या लोकांना पोलीस विभागाच्या खाकीचा धाक राहिला नसल्याने खुलेआम दारू केंद्रात झपाट्याने वाढ होत आहे.
पोलीस कारवाई करत नसल्यामुळे सुज्ञ नागरिकांकडून पत्रकारांना परिसरात गावठी दारूचा अड्डा चालू असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. यावेळी पत्रकार बांधव मानेगाव शिवार दारूच्या भट्ट्यावर गेले असता त्या ठिकाणी काही माणसे दारू तयार करत असल्याचे दिसून आले. मात्र पत्रकार आल्याची कुणकुण लागताच दारूची भट्टी सोडून ते पळून गेले. याबाबत अवैध दारू भट्टी चालू असल्याची माहिती देण्यासाठी मुक्ताईनगर स्थानिक पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे कर्मचारी रवी धनगर यांना संपर्क केला असता बीट हवालदार यांना सांगतो असे उत्तर देण्यात आले.
तर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) दूनगहू यांच्याशी संपर्क केला असता आधी आम्हाला सांगितले असते आता हवालदार ला पाठवतो असे सांगून त्याबाबत टाळाटाळ करत उत्तर एपीआय यांच्या कडून मिळाले. परंतु दोन तासापर्यंत कोणीही कर्मचारी तिथे आलेला नव्हता पोलीस शेवटी आलेच नाही. यावरून लक्षात येते की पोलीस प्रशासन अवैध धंद्यांना खत पाणी घालत असल्याची चर्चा तालुक्यात उगीच नाही. पोलिसांपर्यंत या अड्ड्याची माहिती नव्हती का याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहे. आणि माहिती देऊनही कारवाईस टाळाटाळ करणे म्हणजे कुठं तरी पाणी मुरतय असल्याचे नागरिक सांगतात.
सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना संबंधित हातभट्टी दारू केंद्रांची माहिती देऊन ही कारवाई का केली जात नाही ? असा मोठा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे, तसेच तालुका व परिसरात अवैध धंदे व हातभट्टी दारू केंद्रांची वाटचाल पाहून पोलिसांना सुगीचे दिवस चालू असतील अशी चर्चा परिसरात चालू आहे, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस विभागाकडून कडक कारवाईला बगल देत एक किंवा दोन ठिकाणी नाममात्र कारवाई करत इतर अनेक हातभट्टी केंद्रांना व आरोपींना मोकाट सोडले जाते, यामुळे ही कारवाई हातभट्टी चालकांना लगाम घालण्यासाठी की खिसे भरण्यासाठी असते ?
सदरील दारू भट्टीबाबत मानेगाव येथील बीट हवालदारला माहिती नसेल का ? असा प्रश्न उपस्थित होत असून. अवैध गावठी दारू घाणीच्या साम्राज्य ठिकाणीच का पाडली जाते या अशा घाणीच्या साम्राज्यापासून तयार झालेल्या दारूमुळे विविध प्रकारचे आजार दारू पिणाऱ्यांना होऊन मृत्यूची झुंज यांना द्यावी लागत असते अशा प्रकारे कित्येक कुटुंब उध्वस्त झालेले आहे व लहान मुले महिला पोरके झाले असून अशा गोष्टी प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील ही संपूर्ण रोगराई बंद करणार का ? याबाबत आवाज उठवतील का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना विचारत आहे. दरम्यान, जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व हातभट्टी दारू केंद्रे कायमस्वरूपी बंद करतील का ?
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा