भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

बलवाडी – खिर्डी या उखडलेल्या रस्त्यामुळे व वाढलेल्या झुडपांमुळे वाढला अपघाताचा धोका

बलवाडी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | बलवाडी खिर्डी दरम्यानच्या उखडलेल्या रस्त्यामुळे व रस्त्यावर दुतर्फा गवत व काटेरी बाभळाच्या लहान मोठया झुडूपांमुळे अपघाताचा धोका वाढला असून होणारे हाल पाहता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

सदरचा रस्ता तांदलवाडी, रावेर, ऐनपूर यासह इतरही गावांना जाण्यायेण्यासाठीचा रस्ता आहे. शिवाय हा भाग केळीसाठी प्रसिद्ध असून या रस्त्यावरून आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यासह दुचाकी तसेच ट्रॅक्टर, ट्रक, स्कूल बस यासारख्या चारचाकी वाहनांची वर्दळ सुरूच असते. चार कि.मी च्या रस्त्यापैकी एक ते दिड कि मी रस्ता सोडला तर बाकीचा उखडला असून ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले आहेत.

या खराब उखडलेल्या रस्त्यामुळे नियम बाजूला ठेवून काही वाहनचालक खड्डे चुकवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वाहने चालवतात. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्टीसह या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा किनारा गवत व काटेरी बाभळाच्या तसेच लहान मोठया झुडूपांनी व्यापल्याने वाहनधारक मोठे त्रस्त आहेत. या रस्त्यावर वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. तसेच मोठया वाहनाला ओहरटेक करण्याचा प्रयत्न केला जात असतांना समोरून येणारी साधी दुचाकी वा पायी चालणाऱ्यालाही वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे बाजूला साइडपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने उतरणे दुरापास्त ठरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. सदरच्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून तातडीने समस्या सोडवावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया…
रस्त्याचे तीन तेरा वाजले असून जीवघेण्या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. रस्त्याचे काम लवकरात लवकर न केल्यास आंदोलन करण्यात येईल
जितेंद्र महाजन ग्रा.पं.सदस्य बलवाडी. ता.रावेर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!