महाराष्ट्रशैक्षणिक

१० वी १२ वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी राज्य शालेय शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l काही दिवसावर म्हणजे ११ फेब्रुवारी व २१ फेब्रुवारी पासून अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होणार असून , या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या दडपणाखाली असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्य शालेय शिक्षण मंडळाने ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा सुरू केली आहे. या समुपदेशाने विद्यार्थाना आलेलं टेन्शन , नैराश इत्यादी गोष्टीतून बाहेर काढले जाणार आहे. राज्य शालेय मंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थाना व्यवस्थित परीक्षा देता येणार आहे.

११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत इयत्ता बारावी आणि २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जातील.

विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षा संबंधित मानसिक दडपणावर मात करण्यासाठी समुपदेशक मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन दिले जाईल. या सेवेचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या मानसिकतेवर ताण कमी करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी करावा, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. माधुरी सावरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

शासनाचा हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या समुपदेशन सेवा विद्यार्थ्यांना मानसिक ताण आणि परीक्षेच्या भीतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी या उपक्रमाची आवश्यकता अत्यंत महत्वाची आहे, असे सांगण्यात आले आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक –
1) 9011302997
2) 8263876896
3) 8767753069
4) 7387400970
5 ) 9960644411
6) 7208775115
7) 8169202214
8) 9834084593
9) 8329230022
10) 9552982115

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!