जनसंवाद यात्रेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार– विनोद तराळ
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि| राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा रोहिणी खडसेंच्या संकल्पनेतील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलावर्ग आणि युवा वर्गाचा संवाद यात्रेतील सहभाग लक्षणीय राहिला आहे. मुक्ताई नगर विधानसभेत जनसंवाद यात्रा हि परिवर्तनाची नांदी ठरणार आहे तसेच आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनसंवाद यात्रे मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.
रोहिणी खडसे यांच्याकडे नाथाभाऊं प्रमाणेच असलेली काम करण्याची तत्परता आणि जनसामान्यांची कळकळ यामुळे त्या आदरणीय नाथाभाऊंचाच कित्ता गिरवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या आणि आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करीत असलेल्या रोहिणी खडसेकडे संपूर्ण मुक्ताईनगर मतदार संघ भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहत आहे. या संवाद यात्रेचा भव्यदिव्य समारोप सोहळा दिनांक 1 डिसेंबर रोजी होत असून यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मा.अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माफदाचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनी अंतुर्ली येथील जाहीर सभेत केले.
प्रसंगी शरद पवार साहेबच देशाचे खरे जाणते राजे असून देशभरातील गोरगरीब,कष्टकरी आणि शेतकरी या सर्वांचा त्यांचेवरील विश्वास देशातही परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांचा जनसामान्यांना जगणे मुश्किल झाले ते सांगत गेल्या आठ वर्षात वाढलेल्या महागाई बद्दल तीव्र संताप व्यक्त केला रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या असून गोडेतेल साखर आधी जीवनावश्यक वस्तूंसह डिझेल पेट्रोलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याचे स्पष्ट केले गॅस सिलेंडर महागाई विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या स्मृती इराणी आता कुठे गेल्या असा प्रश्न विचारत लागत ते दुकानात लाभ अशी घोषणा करणाऱ्या नरेंद्र मोदी संपूर्ण कृषी व्यवस्था देशोधडीला लावल्याचे ते म्हणाले.
म्हणूनच महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आदरणीय शरद पवार यांच्याकडे कायमशेने पाहत आहे कारण त्यांनी कधी शेतकऱ्यांना नाराज केले नाही असे सांगत पवार साहेबच महाराष्ट्राचे जाणते नेते असल्याचे स्पष्ट केले सभासद नोंदणी जिल्हा परिषद गटात सभासद नोंदणीचे काम दोन दिवसात पूर्ण करणार असून संपूर्ण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभासद नोंदणी करणारा अंतुर्ली जि. प. गट एक नंबर असेल असा शब्द त्यांनी उपस्थित मान्यवरांना दिला. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या छत्तीसाव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री भोजना, धाबे पिंप्री, लोहारखेडा, पातोंडी, अंतुर्ली येथे माजी मंत्री आ .एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील , महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थां सोबत संवाद साधला
यावेळी यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील, प्रवक्ता सेल संयोजक विशाल महाराज खोले, कार्याध्यक्ष दिपक पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजेंद्र माळी, किशोर चौधरी, प्रदिप साळुंखे, रामदास पाटील, सुधिर तराळ, सुनील कोंडे, ताहेर खा पठाण, सुनिल पाटील,भागवत पाटील, भरत अप्पा पाटील, सचिन पाटील, शाहिद खान,भाऊराव पाटील, नंदकिशोर हिरोळे, मेहमूद शेख, मुन्ना बोडे, प्रविण दामोदरे, नितीन पाटील, भैय्या पाटील,अमोल महाजन, गणेश तराळ,सचिन महाले, रवींद्र पाटील, सुरेश कोळी, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह
अंतुर्ली येथील उपसरपंच गणेश तराळ, लोहारखेडा येथिल दिनकर पाटील, साहेबराव पाटील, सुभाष कोळी ,पंढरीनाथ पाटील,उपसरपंच जिवन चौधरी, पिंप्री भोजना येथील दिनकर पाटील ,सुभाष कोळी, धाबे पिंप्रीपंचम येथील रामदास चौधरी, गोपाळ पाटील, गौतम पानपाटील,रामदास पाटील, छाया ताई तायडे,विठ्ठल चौधरी, मनोहर वायकोळे, वना पाटील, प्रल्हाद पाचपोळे, चिंतामण नमायते,जगन्नाथ नमायते, चंद्रकांत जयनकर,मनोहर चौधरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा