भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अक्षताची तयारी सुरू असतानाच टीम पोहोचली, अन् बालविवाह रोखला, यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १९ वर्षीय तरुणांसोबत बालविवाह लावला जात असताना अक्षताची तयारी सुरू असतानाच टीम पोहोचली, यावल येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी पथकासह जाऊन बाल विवाह रोखला. ही घटना २७ मार्च गुरूवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील दहीगाव येथे घडली.

दिनांक २७ मार्च गुरुवार रोजी सकाळी साडेदहा वाजता
यावल तालुक्यातील दहिगाव या गावात पटेल मोहल्यामध्ये ज्ञानेश्वर गजानन पाटील ( वय १९ ) या तरुणासोबत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात होता. याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी तातडीने दहिगाव हे गाव गाठले आणि या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होत असलेला बालविवाह रोखला.

तर अल्पवयीन मुलगी आणी तरूण व त्याच्या कुटुंबास यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या नंतर अल्पवयीन मुलीस कायदेशिर कार्यवाही पुर्ण करीत बाल सरंक्षण समितीकडे सोपवण्यात आले आहे.

सदर अल्पवयीन मुलगी ही नागपूर जिल्ह्याची असून मुलीच्या विवाहवेळी तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील कोणीच येथे उपस्थित नसल्याचे यावल बाल विकास प्रकल्पाधिकारी अर्चना आटोळे यांच्या कडून सांगण्यात आले. कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करीत या अल्पवयीन मुलीस जळगाव येथील बाल सरंक्षण समितीचे बालसंरक्षण अधिकारी प्रतिक जगदीश पाटील व चाईल्ड लाईनचे कुणाल शुक्ला आणी प्रसन्ना बागुल यांच्या पथकाला सोपवण्यात आले असून अल्पवयीन मुलीचे पालक बालसंरक्षण अधिकारी यांच्या संपर्कात आल्यावर अल्पवयीन मुलीला पालकांकडे सोपविण्याची पुढील कारवाई करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!