ठराविक ठेकेदारानाच कामे न देता “निविदा” प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवाव्या- नगरसेवक शाम अकोलेकडून सभागृहात मुद्दा उपस्थित
सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथील नगरपालिकेच्या दि. १२ गुरवार रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत बऱ्याच विषयांवर तुफानी गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अपक्ष निवडून आलेले तथा शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेले नगरसेवक शाम अकोले यांनी नगरपरिषदकडून राबवण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येण्याचा मुद्दा उपस्थित केला.
ठराविक ठेकेदारानच कशी कामे दिली जातात यात पारदर्शकता असावी जाहिरात सर्वांना परिचयाचा वृत्तपत्रात देण्यात यावी अशी महत्वाची भूमिका मांडत प्रशासक काळातील विकास कामाच्या वाटपार होत असलेल्या निवेदा प्रक्रियेवर सर्वच स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात असताना अकोले यांनी या विषयाला हात घातला आहे.
नगरपरिषदेतील प्रशासक काळातील विकास कामाच्या वाटपा सह कारभारावर सर्वच थरावरून वारंवार प्रश्न उपस्थित होत असताना टीकेची झोड उठत आहे. यासंदर्भात बर्याच तक्रारी करण्यात आल्या आहेत. निवेदा प्रक्रिया बंद खोलीत राबवल्या जात असल्याच्या तक्रारी व ओरड होत आहे, ठराविक ठेकेदारानाच काम कशी दिली जातात, कुठे निविदा काढण्यात येतात. परस्पर कामे देण्याची प्रक्रिया पार पडली जाते. व ठराविक ठेकेदारांच कामे दिली जातात. या बाबत कोणालाही माहिती दिली जात नाही. अशी ओरड होते असताना याच मुद्याला हात घालत नगरसेवक शाम अकोले यांनी निविदा प्रक्रियेत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येण्याची मागणी वारंवार केली.
अशी भूमिका त्यांनी मागील सभेतही घेतली होती.
तसेच याच सभेवेळी अग्निशामक सेवेच्या बळकटी करणासाठी अत्याधुनिक अग्निशामक साहित्य खरेदी करण्यासाठीच्या संदर्भातील विषय घेण्यात आल्यावर एक अग्निशामक गाडीही घेण्यात येण्याचे सभागृहास सुचवले. यावेळी बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली.


