यावल तालुक्यातील महादेव मंदिरातील ११ किलो पितळाच्या घंट्याची चोरी
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील महादेव मंदिरातील ११ किलो पितळाची घंटा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली.
यावल तालुक्यातील मनवेल येथील माणकेश्वर महादेव मंदिरात लावण्यात आलेली ११ किलो वजनाची घंटा चोरीस गेली असून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मनवेल येथे माणकेश्वर महादेव मंदिर असून मंदिराचे लोक सहभागातून बाधकाम सुरू आहे.ही पितळी घंटा दि.६ जुलै च्या मध्यरात्री चोरांनी कापुन नेल्याचा प्रकार सकाळी दर्शनासाठी जाणाऱ्या भावीकांच्या निर्देशनात आला.यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर यावल पोलीस स्टेशनला या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.