भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

तापी परिसरात पुन्हा तब्बल “नऊ” मोटार पंप फोडून तांब्याच्या तारांची चोरी

तासखेडा.ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तापी परीसरातील सुदगांव येथिल सहा विद्युत मोटार पंपांच्या तारांच्या चोरीची घटना ताजी असतांना आज मध्यरात्री रणगांव शिवारात अज्ञात चोरांनी तब्बल नऊ विद्युत मोटार पंप फोडून तांब्याच्या तारांची चोरी करत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत पोलीसांना पुन्हा आव्हान देण्याचे काम केले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,रावेर तालुक्यातील रणगाव येथील सचिन कैलास पाटील (१), बाबुराव पाटील (१), एकनाथ पंडीत कोळी(१), दोधु गेंदू बावस्कर (२), सुकदेव नामदेव कोळी (१), निवृत्ती दयाराम पाटील (१), सुकदेव देवराम पाटील (२), अश्या तब्बल ९ विद्युत मोटार पंप फोडून तांब्याच्या तारांची चोरी करत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले असून चोरांनी पोलीसांसमोर पुन्हा मोठे आव्हान उभे केले आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी तापी परिसरातील सुदगाव येथील शेतकऱ्यांच्या तब्बल सहा विद्युत मोटारी फोडल्या होत्या,सतत च्या होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हैराण झाला असून चोरांना प्रशासनाचा धाकच उरला नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असून आठ दिवसातील ही दुसरी घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात असल्याने चोरांना पकडणे पोलिसांना क्रमप्राप्त झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!