भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबुलढाणा

जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना तत्कालीन लाचखोर तहसीलदाराला दुसऱ्यांदा लाच घेताना एसीबी कडून अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी २ लाखांची “डिमांड” करून ती बुलढाणा येथील आपल्या राहत्या घरी स्वीकारत असतांना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे कार्यरत असलेला तहसीलदार हेमंत पाटील यांना रविवार रोजी सुटीच्या दिवशी दि.१४/०९/२०२५ रोजी अकोला एसीबीच्या “ट्रॅप” लावून पकडले.आरोपी तहसीलदार हेमंत पाटील याची “लाचखोरी”ची पहिलीच वेळ नसून याआधी जळगाव जिल्ह्यातील बोदवड याठिकाणी कार्यरत असताना अगदी पहिल्याच पोस्टिंगमध्ये सुरुवातीच्या ३ महिन्यातच लाचखोरीत पकडला गेला होता.या गुन्ह्यात त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील एका शेतकऱ्याला वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी तहसीलदार हेमंत पाटील ह्याने प्रति एकर ५० हजार रुपये याप्रमाणे २ लाख रुपयांची “खुले आम डिमांड” केली होती. या संदर्भात तक्रारदार यांनी अकोला एसीबीला तक्रार दिली.त्यानुसार अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोताळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांना बुलढाणा येथील त्यांचेच घरी लाच घेताना ताब्यात घेतले.

यापूर्वी १८ डिसेंबर २०२० रोजी अशाच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील तत्कालीन तहसीलदार हेमंत पाटील याच्यासह अन्य दोघ मंडलाधिकारी व तलाठी यांना दोन लाखांची लाच घेताना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. ही कारवाई बोदवड तहसील कार्यालयातच करण्यात आली होती.

आता या वेळी सुद्धा २ लाख रुपयांची लाच घेताना तहसीलदार हेमंत पाटील यांना पुन्हा दुसऱ्यांदा त्याच प्रमाणे पकडण्यात आल्याने पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तहसीलदार हेमंत पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सदर ची कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर,यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अतुल इंगोले,पोलिस अंमलदार संदीप ताले, अस्लम शाह,दिगंबर जाधव व चालक नफीस यांनी यशस्वी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!