भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे धागेदोरे यावल तालुक्यात

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ मधील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांच्या कडून पोलिस तपासात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यातील संशयित आरोपी करण पथरोड याने इंदौर येथून आणलेली तीन गावठी पिस्टल यावल तालुक्यात ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

हत्याकांड प्रकरणातील संशयीत आरोपी करण पथरोड यांनी तीन गावठी पिस्टल व सुमारे ३० च्या वर जिवंत काडतूस
हत्या करण्याच्या उद्देशाने इंदौर येथून खरेदी केले. हा शस्त्रसाठा त्यानी यावल तालुक्यातील. अकलूद या गावातील किरण कोळी याचे घरात ठेवल्याची माहिती पोलिस तपासात समोर आल्याने पोलिसांनी अकलुद येथील किरण कोळी याला शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. दुहेरी हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. हत्याकांडाच्या आदल्या दिवशी मंगळवारी संशयीतांनी तीन्ही पिस्टल व जिवंत काडतूस घेवून बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बारसे व राखुंडे यांची निर्घूण हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया व करण पथरोड यांना अटक केली होती. किरण कोळी याला आरोपींचे शस्त्र लपवण्यात मदत केल्याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी आता इंदौर येथील शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे.पोलिसांची चार पथके रवाना आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!