महाराष्ट्रराजकीय

रणशिंग फुंकले,’ या’ महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात महाविकास आघाडीला गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठं यश मिळालं होतं. मात्र त्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार प्रदर्शन करत राज्यात २३२ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणले. तर फक्त ५० जागांवरच महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं. आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं.

दरम्यान लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आता सर्वांच लक्ष लागलंय गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे, या निवडणुका आता केव्हा होणार?

मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली मध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. ” येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, दीड महिन्यात या सगळ्याच निवडणुका उरकल्या जातील. जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल, त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकतीने काम करा, ” असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे,

येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!