Breaking News | मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून आता २१ वर्ष करण्याच्या केंद्रीय कॅबिनेटने विधेयकाला दिली मंजुरी
नवी दिल्ली | केंद्रीय कॅबिनेटने मुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षावरून २१ वर्ष करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यानंतर आता मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी त्यांच्या भाषणातून दिले होते. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅबिनेटमध्ये दिल्यानंतर सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ मध्ये सुधारणा आणले. आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा होईल. मंत्रिमंडळाची काल (१५ डिसेंबर) झालेल्या बैठकीत मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे.
या टास्क फोर्सने गेल्या वर्षी जूनमध्ये स्थापन करण्यात आली होती. मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्यासाठी नीती आयोगमध्ये जया जेटलींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आली. या टास्क फोर्सने मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षावरून २१ वर्ष करण्याचा अहवाल सादर केला होता. या टास्क फोर्समध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता मिशन, तसेच न्याय व विधी मंत्रालयाच्या विधेयक विभागाचे सचिव यातील सदस्य होते.