प्रतीक्षा संपली : फेब्रुवारी – मार्च चा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणींना? अदिती तटकरेंनी केलं स्पष्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महिलांच्या सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. पात्र लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. लाडक्या बहिणींना आता पर्यंत सात हप्ते त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असून फेब्रुवारी महिना उलटला तरी फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांना अद्याप मिळालेला नाही.
मार्च महिना सुरू झाला असून फेब्रुवारी व मार्च महिन्यांचा हप्ता कधी मिळाणार असा प्रश्न विचारला जात आहे. अशाच लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीसह मार्च महिन्याच्या हप्ता बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी सह मार्च महिन्याच्या ही हप्त्याबाबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुद्द ही माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणींना महिला दिनी मिळणार सरकारकडून गिफ्ट!
८ मार्च हा महिला दीन, या ८ मार्च रोजी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. दिनांक ५ ते ६ मार्च पासूनच प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही आदिती तटकरे यांनी माहिती दिली.
आणि मार्च महिन्याचा हप्ता अधिवेशनाच्या काळात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना सलग दोन महिने आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहिण योजना राबवून राज्यातील २.५ कोटीहून अधिक महिलांना महिन्याला १५०० हजार रुपयांचा लाभ देण्यास सुरूवात केली. तसेच या योजनेचा हप्ता निवडणुकीनंतर २१०० रुपये महिना करण्याचं आश्वासन दिलं. निवडणुकीनंतर मात्र महायुती सरकारने योजनेच्या निकष व अटी कठोर करत लाखों महिलांना योजनेसाठी अपात्र केलं.