ब्रेकिंग : मुंबईत मोटरसाकलची चोरी करत मुक्ताईनगरात होत होती विक्री, चोरटा गजाआड !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | मुंबईत दुचाकी चोरून त्या मुक्ताईनगर तालुक्यात विकणार्या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केली असून त्याच्या कडून तब्बल १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एकाच वेळेस चोरीच्या तब्बल १६ दुचाकी जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील रहिवासी सुनील सुभाष चौधरी हा मुंबईसह परिसरात मोटारसायकलींची चोरी करून त्या मुक्ताईनगर परिसरात विक्री करत असे. या प्रकारे त्याने अनेक दुचाक्या विकल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याला ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस चौकशीत त्याने मुक्ताईनगर तालुक्यात आपण अनेक दुचाक्या विकल्याचे सांगितले.
या अनुषंगाने ठाणे येथील पोलिसांचे पथक त्याला आज मुक्ताईनगरात घेऊन आले होते. या पथकाने मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने तालुक्यात सुनील चौधरी याने विकलेल्या गाड्यांची झाडाझडती घेतली. यात तब्बल १६ चोरीच्या मोटारसायकली आढळून आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरील कारवाई नवघर पोलीस ठाणे मुलुंड पूर्व मुंबई यांच्या पथकाने केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक गणेश सानप, पोलीस उपनिरीक्षक योगेश सोळुंके पोलीस हवालदार सुरेश पाटील सचिन चव्हाण,जितेंद्र मोरे मंगेश दंडगव्हाळ यांचा समावेश होता कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले