…..तर सेतू केंद्र रद्द होईल,सेतू केंद्रांना प्रती अर्जासाठी ५० रुपये राज्य सरकार देणार- गृहमंत्री
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत करावी म्हणून अंगणवाडी सेविका आणि सेतू केंद्रांना प्रति व्यक्ती किंवा प्रती अर्जासाठी ५० रुपये राज्य सरकार देणार आहे. या वरचे पैसे जर कोण्या सेतू केंद्राने घेतले, तर त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल, अशी तंबीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. तसेच, यासंदर्भात तशी ऑर्डर काढली आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करता येईल, तेवढं आपल्याला जलद गतीने काम करता येईल. त्यामुळे, महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. तसेच, ऑनलाईनसाठी पोर्टलवर येणाऱ्या अडचणीही काढल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.