……तर तुम्हाला कुत्र्यांचं मटण खावं लागेल..
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आपल्या मागण्यांसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. धनगरांनी शेळ्या मेंढ्या राखायच बंद केले तर काय होईल अवस्था? जेव्हा मेंढ्या राखायाच बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्यांचं. मटण खावं लागेल. असं वक्तव्य आ.गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
धनगर आरक्षणासाठी सकल धनगर समाज आक्रमक झाला आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) धनगर बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलना गोपीचंद यांनी वादग्रस्त विधान केल्याने नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगरांनी मेंढरं, बकरी राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल. तुम्ही मारतान आम्हाला, या रानातून फिरत असताना तुम्ही त्यांना गुरासारख मारता, तुम्ही कोल्हापूरला आल्या नंतर, तुम्हाला वाटत बोकडाच मटण खावं, पंधरा रस्सा, तांबडा रस्सा, मागता, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.
धनगर समजाल आठ-आठ दहा-दहा महिने मेंढरं घेऊन बाहेर राहतो. कुठंय त्याला घर?. महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या प्रतिचे मांस मिळावे म्हणून दिवसाला ३५ किलोमीटर तो चालतोय. पण कुणाच्या रानात चुकून मेंढरं गेली तर मेंढपाळाला गुराढोरा सारखं मारलं जातं. पोलिस दखल घेत नाही, हा अन्यात आम्ही का सहन करायचा? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.
एसटीतून धनगर समाजाला आरक्षण ही आमची पहिली मागणी आहे. धनगराचं पोरंग शिकलं तर त्याला मेढरं संभाळायची वेळ येणार नाही.सरकारच्या बाजुने धनगर उभा राहिला आहे. मतदान करायला आम्ही पाहिजे. सरकारने धनगर समाजाच्या संदर्भात एसटीचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी देखील पडळकर यांनी केली.