प्रशासनभुसावळ

प्रयागराज महाकुंभ मेळा दरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या “या” रेल्वेगाड्या रद्द

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. परंतु उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज मंडळात महाकुंभ मेळा-२०२५ निमित्ताने १२ रेल्वे गाड्या त्यांचा प्रारंभिक स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत. यांसदर्भात प्रशासनाकडून असे आवाहन करण्यात आले आहे की प्रवाशांनी रेल्वे अधिकृत चौकशी सेवा १३९ द्वारे गाडीच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन प्रवासाची योजना आखावी.

या १२ रेल्वे गाड्या आहेत रद्द
१. गाडी क्रमांक १९०४५ सूरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस दि. १९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
२. गाडी क्रमांक १९०४६ छपरा-सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रद्द.
३. गाडी क्रमांक १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेस दिनांक १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
४. गाडी क्रमांक १९४३५ अहमदाबाद-आसनसोल एक्सप्रेस दि. २० फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी रद्द.
५. गाडी क्रमांक ०१०२५ दादर-बलिया त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी दि. १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
६. गाडी क्रमांक ०१०२६ बलिया-दादर त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी दि. २१ फेब्रुवारी रोजी रद्द.
७. गाडी क्रमांक ०११०२७ दादर-गोरखपूर एक्सप्रेस विशेष गाडी दिनांक १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
८. गाडी क्रमांक ०१०२८ गोरखपूर-दादर एक्सप्रेस विशेष गाडी दि. २० फेब्रुवारी रोजी रद्द.
९. गाडी क्रमांक ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस दिनांक १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
१०. गाडी क्रमांक ११०५६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रद्द.
११. गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्सप्रेस दिनांक १८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द.
१२. गाडी क्रमांक ११०६० छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २० फेब्रुवारी रोजी रद्द.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!