“चेले चपाटे राजीनामे देत आहेत म्हणे,….” रक्षाताई फॅन क्लब वरून पोस्ट; खडसेची एसपीकडे तक्रार !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभेसाठी भाजपामधील शेकडो पदाधिकारी नाराजी व्यक्त करत सामुहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना अश्यात रक्षाताई फॅन क्लब या नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून “चेले चपाटे राजीनामे देत आहे म्हणे, घं….. फरक पडत नाही” अश्या आशयाचे काही आक्षेपाऱ्य पोस्ट केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचे तिकीट कापल्याने हा नाराजीचा सूर असल्याने कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकार्यांनी घेतली असून पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे दिले आहे. यावलच्या भालोद इथे हजारो भाजपाचे कार्यकर्ते जमा होऊन संतप्त प्रतिक्रिया देत आहे अश्यात रक्षाताई फॅन क्लब या नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून “चेले चपाटे राजीनामे देत आहे म्हणे, घं….. फरक पडत नाही” अश्या आशयाचे आक्षेपाऱ्य पोस्ट केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात रक्षा खडसे यांच्याशी ‘मंडे टू मंडे न्युजनी’ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, खासदार खडसे बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यांची भुमिका कळू शकली नाही. मात्र, खासदार रक्षा खडसेंकडून पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या कडे तक्रार करण्यास आल्याची माहिती मिळत आहे.
रावेर, यावल, भुसावळ सामूहिक स्वाक्षरी मोहीम
भाजपचा राजीनामा या ठिकाणी देत आहोत, असं पत्र समोर आलं आहे. पत्रात प्रति बावनकुळे साहेब, आज रावेर लोकसभेची जागा जाहीर झाली. अमोल जावळे यांना डावलण्यात आलं, पुन्हा अन्याय झाल्याने लोकसभा मतदारसंघात आम्ही यापुढे भाजपाचे काम करणार नाही, अशी सामूहिक स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे, याचाच संदर्भ या पोस्टचा असल्याचे सांगितले जात आहे.