क्राईमयावल

बस प्रवासात शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बसमध्ये प्रवास करीत असताना यावल तालुक्यातील वड्री येथील शिक्षिकेची गळ्यातील सोन्याची ६४ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना विरावली ते यावल दरम्यान घडली

या बाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील वड्री या गावाची रहिवाशी असलेल्या योगेश्वरी नारायण धनगर. वय-४५ वर्ष. या एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहेत. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान यावल तालुक्यातील वीरावली ते यावल असा बस प्रवास करीत असताना दरम्यान च्या बस प्रवासामध्ये कोण्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याची पोत ( मंगळसूत्र ) चोरून घेतली.

सदरील घटना लक्षात आल्यानंतर योगेश्वरी धनगर या शिक्षिका महिलेने यावल पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर १७ फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!