बनावट नोटा प्रकरणातील तिसरा आरोपी सावदा पोलीसांच्या ताब्यात, रॅकेट चा पार्दाफॉश होणार?
सावदा, ता. रावेर.जिल्हा – जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा शहरात दि. १३ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी शहरातील ख्वाजा नगर मधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना अटक करून त्याच्या कडून १०० रुपयांच्या ७६ बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या, यातील तिसरा आरोपी फरार होता. या दोघांना बनावट नोटा विक्री करणारा यातील तिसरा आरोपी ‘ आवेश ‘ (भुसावळ) याला सावदा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली असून आज त्याला कोर्टात हजर केले असता त्याला दि.१६ मंगळवार पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. त्याच्या कडून रॅकेट चा पार्दाफॉश होण्याची शक्यता आहे.
शुक्रवार दि. १३ डिसेंबर ला दुपारी २ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी शहरातील ख्वाजा नगर मधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना बनावट चलनी नोटा बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्यांनी भुसावळ येथील आवेश नामक व्यक्ती कडून ४ हजार रुपयांना १० हजारांच्या बनावट नोटा विकत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले. मात्र आवेश फरार असल्याने त्याने त्या बनावट चलनी नोटा कुठून आणल्या या बाबत खुलासा होत नव्हता.
सावदा पोलिसांनी सापळा रचून आवेश ला भुसावळ येथून शिताफीने अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. आता त्याने बनावट नोटा कोणाकडून आणल्या, त्याच्या मागे आणखी कोण कोण आहे, हे मोठे रॅकेट आहे काय.? त्यांनी कुठे नोटा चलनात आणल्या आहेत काय? या बाबत पोलिस तपासता समोर येईलच . पुढील तपास सावदा पोलिस स्टेशन चे सपोनी विशाल पाटील करीत आहेत.