हाच तो सुखद क्षण !! विठुरायाच्या दिंडीत फुगडी घालून नाचण्याचा मोह पोलिसांनाही अनावर
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्याची ओढ लागलेले वारकरी दरवर्षी पालखी सोहळ्यासोबत पायी वारीने आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर येथे जात असतात जसजशी आषाढी एकादशी जवळ येत आहे तशी वारकर्यांमधील उत्सुकता वाढायला लागली आहे.
ज्ञानोबांची पालखी फलटण मधून बरड कडे मार्गस्थ झाली आहे. ऊन पाऊस झेलत वारकरी सध्या पंढरीकडे मार्गक्रमण करत आहे. या वारीत आजुबाजूची विविध घटकातील मंडळी वारकर्यांसोबत हा आनंद शेअर करतात. या वारीत काही पोलिस कर्मचार्यांचाही सहभाग पहायला मिळाला.पोलिसही माणूसच आहेत. विठुरायाच्या दिंडीत फुगडी घालून नाचण्याचा मोह पोलिसांनाही अनावर झाला.