भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

वसुली प्रकरणातील त्या पोलीस कर्मचाऱ्यांची निलंबित !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : कन्नड घाटात गुरुवारी रात्री चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी पैसे वसुली करताना दिसले होते. पोलीस चौकशीत दोषी आढळून आलेल्या ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

याप्रकरणी चाळीसगावच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता. औट्रम घाटात पोलीस ट्रकचालकांकडून बेकायदा रक्कम वसूल करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाचा वेश करून स्टिंग केले. यानंतर पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी शुक्रवारी अहवाल सादर केला. त्यात ४ कर्मचारी दोषी असल्याचे नमूद केले.

पोलिस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंढे यांनी शनिवारी याप्रकरणी ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबीत कर्मचाऱ्यांमध्ये गणेश वसंत पाटील, प्रकाश भगवान ठाकूर, सतीश नरसिंग राजपूत आणि संदीप भरत पाटील यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!