” ज्यांनी-ज्यांनी जवळची माणसं गमावली ” त्यांनाच “आयुष्याची ” किंमत समजली………
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
जळगाव (प्रतिनिधी) : मृतांची संख्या वाढत आहे. दररोज जळणाऱ्या चिता चिंतेचं कारण ठरत आहेत. मृत्यूचं प्रमाण किती वाढलंय याची कल्पना स्मशानात दररोज येणारे मृतदेह पाहून येऊ शकेल. ” ज्यांनी ज्यांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत ” त्यांना ” ” आयुष्याची ” किंमत समजली आहे, गरिबांना मोफत उपचार द्या, औषधांचा काळाबाजार रोखा,असा सल्ला मध्यप्रदेशातील देवास येथील लिलाधर व्यास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला आहे.
व्यास यांनी या पत्रात कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात,मी अंत्यविधीचं सामान विकतो. माझं एक दुकान आहे. मात्र आयुष्यात कधीच इतकी भयावह परिस्थिती पाहिली नाही. राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या स्मशानात गेल्यावरच कमी होत आहे. औषधं आणि इंजेक्शन महाग असल्यानं गरिबांना उपचार घेताना अडचणी येत आहेत.त्यामुळे इंजेक्शनचं उत्पादन वाढवा, त्यावरील कर कमी करा. गेल्या कित्येक दिवसांपासून मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. आधी दिवसाला एक ते दोन जणांचा मृत्यू व्हायचा. पण आता दिवसाला सरासरी १२ ते १५ जणांचा मृत्यू होतोय.
अंत्यविधीच्या सामानाच्या दुकानामुळे माझी उपजीविका चालते. मात्र मृत्यूचं वाढलेलं प्रमाण चिंताजनक आहे. मृतांमध्ये वृद्ध, तरुण, लहान मुलं अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या यादीत कदाचित माझं किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांचं नाव येईल, अशी भीती व्यास यांनी व्यक्त केली. कोरोना रुग्णांवरील उपचारार्थ वापरली जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्यानं त्यांची चढ्या दरानं विक्री होत असल्याचं मी ऐकलं आहे. गरीब व्यक्ती हे महागडं इंजेक्शन कसं खरेदी करणार? हे इंजेक्शन विकत घेणं त्याच्यासाठी अतिशय अवघड आहे साहेब, असं व्यास यांनी पत्रात म्हटलं आहे.