भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावजामनेर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या, हजारोंच्या संख्येच्या मूक मोर्चात मागणी

जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | इयत्ता १० मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बस चालक जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील तरुण अबिद हुसेन शेख याने जामनेर तालुक्यातील माळेगाव येथील शेतात नेऊन बलात्कार केल्याची घटना उघड झाली या प्रकरणी १९ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून शेंदूर्णीत नागरिकांनी रविवारी मूक मोर्चा काढला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या असे मोर्चाच्या शेवटी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील तरुण अबिद हुसेन शेख हा दररोज ५० ते ६० विद्यार्थी – विद्यार्थिनी स्कूल बसने शाळेत ने आण करीत असतो. या आरोपीने या पूर्वी आणखीही असे काही प्रकार केले आहेत का? या बाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुकमोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला. या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता. यावेळी बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी घणाघाती भाषणात आरोपी व त्यांच्या साथीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी असे सांगून, ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी महिलांच्या वतीने लिना मनोज चव्हाण यांनी महिला-मुलींना मार्गदर्शन केले.

सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले. आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले. पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड, पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे, शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की, आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!