हजारो चैतन्य साधकानी घेतले पुण्यतिथी निमित्त संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी चे समाधी दर्शन
पाल, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l रावेर तालुक्यातील सातपुडा परिसरात अज्ञान रुपी अंधःकारात भरकटलेल्याना ज्ञानाचे अद्भुत प्रकाश देऊन लाखो भक्तांचे जीवन अध्यात्मिक जीवन उंचावणारे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार व श्री वृंदावन धाम आश्रमाचे सस्थापक सद्गुरू परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांची दी 25 डिसेंबर रोजी 15 वी पुण्यतिथी (समाधी दिवस ) महोत्सव साजरा करण्यात आले. या वेळी देशभरातील हजारो चैतन्य साधक व भाविक भक्तांनी पाल येथील श्री हरिधाम मंदिरात विराजित परम पूज्य बापूजीचे समाधी दर्शन घेतले.
ब्रम्हलीन सद्गुरू परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांची 15 वी पुण्यतिथी (समाधी दिवस ) महोत्सवात दी 24 डिसेंबर रोजी चैतन्य साधक मुंबई समितीतर्फे रावेर ते पाल पायी दिंडी दाखल झाली. त्या नंतर रात्री 8 ते 10 पर्यंत आश्रमाचे विद्यमान पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांचे सत्संग व सद्गुरू परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री महादेव चैतन्य उर्फ दगडू जी बापूजी यांच्या जयंती निमित्त दीपोत्सव आणि भजन संध्या चा साधकांनी लाभ घेतला. त्यानंतर पाल आश्रमात स्थित बन्सिपहाड दगडाने कला कृत भव्य श्री हरिधाम मंदिर वर्धापन दिवसा निमित्त मंदिरात रोषणाई करण्यात आली.
देशभरातून शेकडो संत महंत महामंडलेश्वर तसेच हजारो भाविक भक्त पूज्य बापूजी यांच्या समाधी दर्शनाकरिता दरवर्षा प्रमाणे यंदा ही आले असून दि 25 डिसेंबर रोजी या करिता त्यांच्या सोयी सुविधेसाठी चैतन्य साधक परिवारंतर्फे पाल आश्रमात सत्संग पांडाल, भोजन व्यवस्था, संत निवास, भक्तांकारिता निवास, जल, स्वछालंय, प्राथमिक उपचाराकरिता आरोग्य सुविधा, पार्किंग, अश्या विविध प्रकारच्या सोयी सुविधे च्या तयारी करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता प्रशासनाचे सहकार्य लाभले.दी 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजे पासून पाल येथील श्री हरिधाम मंदिरात स्थित परम पूज्य बापूजी यांच्या समाधी स्थळी पादुका पूजन व अभिषेक तसेच 7 वाजे पासून ध्यान, प्रार्थना, गुरुदिक्षा, व 10 वाजेपासून उपस्थित संतांचे श्रद्धावचन, व आश्रम प्रकाशित चैतन्य दिनदर्शिका चे प्रकाशन,महा आरती, व शेवटी पाल समिती तर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या महोत्सवात फैजपूर येथील महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, पालघर चे भारतानंद सरस्वती जी महाराज, मुबंई चे स्वामी शिवरूपांनंद जी महाराज,फैजपूर प्रजापीता ब्रम्हकुमारी मीरा दीदी,खंडवाचे स्वामी अर्जुन दास जी महाराज, बुऱ्हाणपूर चे स्वामी सरसपुरीजी महाराज,डोंगर दे चे स्वामी स्वरूपानंद जी महाराज,चाळीसगाव चे स्वामी श्री विशूधानद जी महाराज,झिरण्या चे स्वामी श्री राघवानंद जी महाराज, श्री करणपुरी जी महाराज,फैजपूर चे महंत श्री पवन दास जी महाराज,श्री संतदास जी महाराज,ह भ प श्री धनराज महाराज अंजाळेकर,ह भ प श्री भरत महाराज म्हैसवाडीकर, उपस्थित होते.
त्याच प्रमाणे मथुरा चे श्री हरिशरणा नंद जी महाराज, जामनेर चे श्याम चैतन्य जी महाराज, सिंगाची चे कैलास महाराज, टोक सर चे महेश चैतन्य जी महाराज, आश्रमाचे श्री शिव चैतन्य महाराज, श्री दिव्य चैतन्य महाराज, श्री ब्रज चैतन्य महाराज, श्री नवनीत चैतन्य महाराज, श्री राधे चैतन्य महाराज, श्री रमण चैतन्य जी महाराज, श्री श्री सर्व चैतन्य महाराज,श्री हरीश चैतन्य महाराज, श्री ऋषीं चैतन्य महाराज, श्री माधव महाराज, श्री शुभ चैतन्य महाराज, श्री ललित चैतन्य महाराज,पंडीत रामहरी भाईजी, श्री विजय पंडीत या सह रावेर आमदार अमोल जावळे, हरिभाऊ राठोड,भरत महाजन, सुरेश धनके,सह आदी उपस्थित होते.