दहा दुचाक्यांसह तिघांना अटक, गुन्हे शाखेचे कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीच्या १० दुचाक्यांसह तिघांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील विशाल भोई हा चोरीच्या मोटार सायकली वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्या नुसार पोलिस पथकाने विशाल भोई याला टाकरखेडा येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या देवानंद उर्फ आनंद सुरळकर आणि सूरज अशोक पारधी या दोन साथीदारांची नावे सांगितल्याने पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून ४ लाख ३३ हजार रुपये किमतीच्या १० मोटार सायकली जप्त केल्या.
या मोटार सायकली त्यांनी जळगाव एम आय डी सी हद्दीतून पाच, भुसावळ शहर हद्दीतून १ जळगाव शहर हद्दीतून एक,जिल्हापेठ हद्दीतून एक अशा आठ व अन्य दोन अशा दहा मोटार सायकली चोरल्या होत्या. पोलिसांनी विशाल गोपाळ भोई. रा. टाकरखेडा . ता.जामनेर. देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर सूरज अशोक पारधी.साळुंके. रा. टाकरखेडा .ता.जामनेर.याना अटक करून पुढील तपास करीत आहेत.