रावेर मध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा, पिता – पुत्रा सह तिघांना अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर शहरात आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणारे व जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन सट्टा घेणाऱ्या हिरामण दगडु चौधरी. वय-६२, वर्ष. आकाश हिरामण चौधरी, वय ३० वर्ष. दोघे रा. रामचंद्र नगर, रावेर या पिता – पुत्रांसह् अमनखों मनसुरखॉ. रा. उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर. अशा तिघांना रावेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून १ लाख २२ हजार ५०० रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.
रावेर पोलिसाना रावेर मध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार सापळा रचत रावेर शहरात दि.१२ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रामचंद्र नगरात घराचे आडोशाला दोन इसम आयपीएल क्रिकेट मॅचवर संघाचे हार जितवर लोकांकडुन पैसे घेवुन जुगाराचा खेळ खेळताना व जुगार लावताना दिसून आले. सदर इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता उभे असलेले इसम गल्ली बोळाचा फायदा घेवुन पळून गेले. त्या पैकी जुगाराचा खेळ घेणारे इसम हिरामण दगडु चौधरी (वय-६२, रा. रामचंद्र नगर, रावेर), आकाश हिरामण चौधरी (वय ३०, रा. रामचंद्र नगर, रावेर) या पिता पुत्रांना जागीच पकडुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ जुगाराचे बुक व काही मोबाईल मिळून आले.
तसेच दुसऱ्या कारवाईत रावेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक इसम त्याचे जवळील स्लीप बुकवर काहीतरी लिहतांना दिसले व त्यांचे जवळ अवती भवती काही इसम उभे असल्याचे पोलिसांना दिसले. या इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता उभे असलेले इसम गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यापैकी जुगाराचा खेळ घेणारा इसम अमनखों मनसुरखॉ (रा. उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर) यास जागीच पकडुन त्यांची अंगझडती घेतली. त्यांचे जवळ जुगाराचे बुक व मोबाईल मिळून आले आहेत. त्याचेकडून एकुण ११ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
असा दोघ कारवाईत १ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून हिरामण दगडु चौधरी. वय-६२, वर्ष. आकाश हिरामण चौधरी, वय ३० वर्ष. दोघे रा. रामचंद्र नगर, रावेर या पिता – पुत्रांसह् अमनखों मनसुरखॉ. रा. उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर. अशा तिघांना रावेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर एसपी अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन, रावेर मधील पो. नि. डॉ विशाल जयस्वाल, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शि. प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे, विकार शेख, विशाल पाटील, सविन घुगे, सुकेश तडवी यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.