भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अवैध कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या गोवंश जातीच्या तीन गो-हयांची सुटका

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपुर शहरात यावल रोडवरील हॉटेल अन्नपुर्णा येथे रोडवर सार्वजनीक जागी आरोपी जहांगीर चांदों तडवी, वय-४६, रा. मारुळ, ता. याबल हा ३ गोवंश जातीचे गो-हयांचे अवैधरित्या कत्तलीच्या उददेशाने अवैधरित्या मिळुन आल्याने त्याचेवर फैजपुर पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांची स्थानिक नागरीकांच्या मदतीने कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १४ मे २०२५ रोजी रात्री ८:३० वाजेचे सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे रात्री ११ वाजेचे सुमारास मिळालेल्या बातमीप्रमाणे फेजपुर शहरात यावल रोडवरील हॉटेल अन्नपुर्णा येथे रोडवर सार्वजनीक जागी जहांगीर चांदखों तडवी, वय-४६. रा. मारुळ, ता. यावल हा पोलीसांना मिळुन आल्याने स्थानिक नागरीकांचे मदतीने नमुद आरोपी चालक नामे जहांगीर चांदखों तडवी,वय-४६, रा. मारुळ, ता. यावल याचे ताब्यातील मालवाहु छोटा हत्ती चारचाकी वाहन क्रमांक MH-02-YA-6799 व मालक वास थांबवुन त्याचे विरुदध फैजपुर पोलीस स्टेशनला दिनांक १४ मे रोजी रात्री ११:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत १)१५,०००/- रुपये किमतीचा एक लाल काभ-या रंगाचा निमाड जातीचा सुमारे १० वर्षे वयाचा गो-हा. २) १५,०००/- रुपये किमतीचा एक लाल रंगाचा देशी जातीचा सुमारे ८ वर्षे वयाचा गो-हा,

३) १५,०००/- रुपये किमतीचा एक काळया रंगाचा देशी जातीचा सुमारे १२ वर्षे वयाचा गो-हा.
४)८०,०००/- रुपये किंमतीची एक टाटा कंपनीची पांढ-या रंगाची छोटा हत्ती वाहन क्रमांक MH-02-YA-6799. असा एकूण १,२५,००० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई हो पोलीस अधिक्षक सो, जळगांव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो, मा. उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. कृष्णांत पिंगळे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सो, वांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/रामेश्वर मोताळे, तसेच पोउनि/मैनुददीन सैय्यद, पोउनि/विनोद गाभणे, सफौ/ देवीदास सुरदास पोहेकों/ज्ञानेश्वर चौधरी, पोहेकॉ/ रविंद्र मोरे, पोहेकॉ/अनिल पाटील, पोना/ विशाल मोहे पोकों/ राहुल चौधरी, पोकॉ/ विजय परदेशी यांनी कारवाई करण्यात केली.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/विनोद गाभणे हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!