भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

सरकारी जागेत अतिक्रमण व कर न भरल्याने जळगाव जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सरकारी जागेवर ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केल्याने व कर न भरल्याने जळगाव जिल्ह्यातील शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन अर्जुन बुंधे, अबुबकर शकील खाटीक, शेख रइस शेख ईलीयास या ३ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीमध्ये नितीन बुंधे, अबुबकर खाटीक, शेख रइस शेख ईलीयास हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. नितीन बुंधे व अबुबकर खाटीक यांनी आपल्या परिवारातील राहत्या घरांची घरपट्टी, पाणी पट्टी व इतर कर विहित मुदतीच्या आत भरले नाही, म्हणून अर्जुन काशिनाथ पवार यांनी दोघांचे ग्रामपंचायत सदस्यत्व पद अपात्र व्हावे, म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
दोन्हीं सदस्यांकडील कडील कागदपत्रे यांची शहानिशा करून ग्रामपंचायतीची थकबाकी मुदतीत न भरल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. ९ जानेवारी रोजी अपात्र घोषित केले.

तसेच ग्रामपंचायत सदस्य शेख रइस शेख ईलीयास यांनी शासकीय जागेत जास्तीचे बांधकाम करून रहदारीस अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे मुरलीधर रामदास बारी यांनी रईस शेख यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. रईस शेख यांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द ठरविले आहे. एकाच वेळी तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाल्याने शिरसोलीत खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!