Big Breaking : तीन लाखांची लाच, भुसावळ पोलीस निरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
भुसावळ, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी । पोलीस स्थानकात बायोडिझेलच्या दाखल गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडी अंती तीन लाख रूपयांची लाच घेतांना भुसावळ Bhusawal Bribe बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील आणि खासगी पंटर वृषी शुक्ला यांना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायोडिझेल वाहतूक करणारा टँकर पकडून बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला होता. या प्रकरणात दाखल गुन्हात सहआरोपी न करण्याकरता तक्रारदारांकडे ५ लाखांची बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी मागणी केली. तडजोडी अंती ३ लाख रूपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार धुळे लाचलुचपथ विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संतोष पावरा व पथकाने यांनी मंगळवारी १८ जुलै रोजी सापळा रचत पोलीस निरीक्षक गायकवाड आणि रायटर पोलीस नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून खासगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला रा. हनुमान वाडी, भुसावळ यांने तक्रारदारकडून ३ लाख रूपयांची लाच स्विकारली. त्याचवेळी धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्हा पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे