भुसावळ खुनाने हादरले; एकाच रात्री तीन खून : कंडारीत डबल मर्डर, तर भुसावळात एकाची निर्घृण हत्या
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क : तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार व चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर येते तोच भुसावळात मध्यरात्री एकाचा खून झाला आहे. यामुळे एकाच रात्री तिघांचा खून झाल्याने परिसर हादरला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
भुसावळ तालुक्यातील कंडारी दुहेरी हत्याकांडाच्या घटना हादरली असून दरम्यान, सदरील घटना शुक्रवारी रात्री सडे दहा वाजेच्या सुमारास वखार परिसरातील शाळेजवळ घडली असून शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तोच, भुसावळ शहरात मध्यरात्रीच्या सुमारास चमेल नगराजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ निखील राजपूत याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकाच रात्रीतून तीन खून झाल्याने परिसर हादरला आहे.
कंडारी दुहेरी हत्याकांडातील दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे. हल्लेखोर खुनानंतर पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.