ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीत रींगणात अपक्ष उमेदवार करत असलेले विनोद सोनवणे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एकाला चौकशीकमी ताब्यात घेतले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तर यातील दोन आरोपी हे फार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुक्ताईनगर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी प्रचार फेरी राजूर गावात सुरू असतांना दुचाकीवर असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंत हल्लेखोर हे पसार झाले होते. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील तीन जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपी फरार झाले आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिपक दादाराव शेलोडे {वय २२ रा. येवती ता.बोदवड} आणि आयुष उर्फ चिकू गणेश पालवे {वय १९ रा. नाडगाव ता.बोदवड} यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तर विकी गुरचड {वय ३० रा. नाडगाव ता.बोदवड} याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून उर्वरित इतर दोन जण फरार झाले आहे.