सावदयात खांबावर विजेचा धक्का लागून तीन वीज कामगार गंभीर जखमीं
सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथे विद्युत खांबावर काम करीत असताना विजेचा जोरदार धक्का लागून तीन कामगार खाली पडल्याने गंभीर जखमीं झाल्याची घटना आज बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेली अधिक माहिती अशी की, आज बुधवार दिनाक २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सावदा येथील स्टेशन रोड परिसरात महावितरण कंपनीच्या १३२ केव्हीए उपकेंद्रांतर्गत असलेल्या १३२ केव्हीए (132 KV) क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या विद्युत खांबावर काम सुरू होते. हे काम ठेकेदारी पद्धतीने करण्यात येत असून, त्यासाठी बिहार राज्यातील काही कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. हे कामगार खांबावर चढून तांत्रिक काम करत असताना अचानक विद्युत तारांमध्ये प्रवाहित असलेल्या विजेचा त्यांना संपर्क झाला. क्षणात तिघांनाही विजेचा प्रचंड मोठा जोरदार झटका बसल्याने ते तिन्ही कामगार खांबावरून जोरात जमिनीवर कोसळले. ते खाली जमिनीवर फेकले गेल्याने तिघे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


