भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मधापुरीत थरार! कर्नाटकातील भक्तांची जबर मारहाण करून साडेआठ लाखांची लूट

मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकार

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके l मुक्ताईनगर  तालुक्यातल्या मधापुरीत दोन कर्नाटकातील भक्तांवर दहा जणांनी हल्ला करून तब्बल साडेआठ लाखांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने या दोघांना सापळ्यात ओढून अक्षरशः चोप देत लूटमार करण्यात आली.

कर्नाटकच्या बंगळुरू येथील अभिषेक एस. सी. आणि त्यांचा मित्र सतीश धुपेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते अजिंठ्याकडे निघाले असताना रस्त्यात एका महिलेने त्यांना थांबवलं.

तिथं पोहोचताच अचानक दहा जणांनी त्यांना घेरलं. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दोघांना अक्षरशः धूळ चारली. यानंतर त्यांच्या खिशातील २ लाखांची रोकड, ७५ हजारांची अंगठी, दीड लाखाचं ब्रेसलेट, २५ हजारांचा स्मार्टफोन, यूपीआयद्वारे ४ लाखांची तात्काळ ट्रान्सफर असा एकूण साडेआठ लाखांचा ऐवज लुटला.

इतकंच नाही, तर हरीणाच्या कातड्यासोबत फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केला. “पोलिसांत तक्रार केली तर फोटो व्हायरल करू,” अशी धमकी देत हे सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले.

मारहाणीत जखमी झालेल्या अभिषेक आणि सतीश यांनी तातडीनं मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून दहा अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक नयन पाटील तपास करत असून, आरोपींचा लवकरच छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!