भुसावळसामाजिक

“अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमातून शिवचरित्राचे तेज नव्या पिढीच्या मनामनांत रुजेल” – आ. अमोल जावळे

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग आठव्या वर्षी या भव्य आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचा अद्वितीय वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे, हे या स्पर्धेच्या यशस्वीतेचे, लोकप्रियतेचे आणि पारदर्शकतेचे जिवंत प्रतीक आहे. ही स्पर्धा केवळ गुणांच्या चाचणीसाठी नसून, तरुण पिढीच्या मनात शिवचरित्राचे तेज जागवण्याचे एक प्रभावी माध्यम बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे नेतृत्व, आणि त्यांचा आदर्श नव्या पिढीच्या मनामनांत रुजवण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले.

अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळच्या वतीने बुधवारी (दि. १९) शिवजयंती दिनी जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमोल जावळे बोलत होते. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ७७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि आपल्या प्रभावी वकृत्वातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव केला. ही स्पर्धा ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार अमोल जावळे, प्रा. डॉ. भाग्यश्री भंगाळे, ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, समन्वयक शैलेंद्र महाजन आणि सह समन्वयक राहुल भारंबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले, तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे यांनी केले.

पहिली ते दहावी आणि खुल्या अश्या पाच गटात स्पर्धा झाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर मावळे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण , छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणवैशिष्ट्ये, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, आज शिवराय असते तर, आधुनिक काळात शिवरायांच्या विचारांची गरज, छत्रपती शिवाजी महाराजांची राजीनीती, राजमाता जिजाऊंचे बाळकडू – आधुनिक काळाची गरज, मी छत्रपती शिवाजी राजे भोसले बोलतोय या विषयावर वकृत्व सादर झाले.

स्पर्धकांचे २४ वर्ग करण्यात आले.प्रत्येक वर्गात दोन असे ४८ परीक्षकानी परीक्षण केले. आशय, सभाधिटपणा, विषय मांडणी, हावभाव, आवाजातील चढ उतार आणि परिणामकारकता यावर आधारीत परिक्षण करण्यात आले.दोन परिक्षकांचे गुण एकत्र करुन प्रत्येक वर्गातील प्रथम तीन विजेते काढण्यात येणार आहे.या सर्व विजेत्यांची अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी घेण्यात येणार आहे. नंतर तेथेच प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्कम व शिव चरीत्र देउन गौरवण्यात येणार आहे.अंतिम फेरी २६ फेब्रवारी रोजी सकाळी १० वाजता तर बक्षीस वितरण ११ वाजता नहाटा कॉलेज लायब्ररी हॉल, भुसावळ येथे होणार आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, डॉ.संजू भटकर, विक्रांत चौधरी, अमितकुमार पाटील, समाधान जाधव, तेजेंद्र महाजन, प्रसन्न बोरोले, प्रा.डॉ.शामकुमार दुसाने, हितेंद्र नेमाडे,राजू वारके, कुंदन वायकोळे, ललित महाजन, उमेश फिरके, केतन महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, शिरीष कोल्हे, कपिल धांडे, मंगेश भावे, सचिन पाटील, विजू कलापुरे, राहुल पाटील, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील आदिनी परिश्रम घेतले.

४८ परिक्षकानी केले परिक्षण
प्रकाश विसपुते, दिनकर जावळे, एस एस अहिरे, पी जी पाटील, संजीव बोठे, टी एम करणकाळ, ज्ञानेश्वर मोझे, एस एस जंगले, गोपाळ पवार, अशोक तायडे, रमाकांत पाटील, संदीप बोरोले, एस पी झांबरे, ऋषिकेश पवार, बी डी चौधरी, एन के पाटील, शितल इंगळे, केतन वाघ, सचिन नेहते, बी एन पाटील, गणेश जगताप, मनीष गुरूचळ, सोनाली वासकर, महादेव हरीमकर, संजय अंदुरकर, उज्वला सोनार, पुष्पा वंजारी, जागृती खडसे, मीना दुपारे, संध्या भोळे, सचिन ढालपे, ज्योती मोटे, कल्पना माळी, भाग्यश्री रायकर, रूपाली सोनवणे, भाग्यश्री लोहार, निशा पाटील, भारती बैरागी, यामिनी फेगडे, दिपाली भंगाळे, क्रांती वाघ, चैताली चौधरी, निलेश पाटील, रवींद्र पठार, पंकज डोंगरे, घनश्याम सावरकर, ज्ञानेश्वर सोनवणे आदिनी परिक्षण केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!