भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळशैक्षणिक

नॅशनल स्केटिंग स्पर्धेत भुसावळ येथील तीर्थराज पाटील दुसरा क्रमांक मिळवून विजयी

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गोवा येथे भारतीय युवा व्यवहार व क्रिडा मंत्रालय यूथ होस्टेल येथे रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशनल स्तरावरील स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये गोवा, आंध्र प्रदेश ,महाराष्ट्र, कर्नाटक,अशा अनेक राज्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर 6 या गटा मध्ये भुसावळ येथील तिर्थराज मंगेश पाटील देशात दुसरा नंबर आला.

तीर्थराज पाटील याला 1 सिल्वर मेडल व 1 ब्रांज मेडल मिळाले व पुढील महिन्याच्या थायलंड येथे होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले आहे त्याच्या निवडीबद्दल इंटरनॅशनल कोच श्री भिकन अंबे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याच्या नॅशनल स्तरीय निवडीमध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चे त्याचे कोच पियुष दाभाडे सर व दिपेश सोनार सर यांनी खुप मेहनत घेतली आहे.

भुसावळ शहरातील एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल चा 1A वर्गाचा विद्यार्थी आहे. नॅशनल साठी प्रॅक्टिस करत असतांना तीर्थराज ला शाळेतील शिक्षक लोकांनी पण खूप छान मार्गदर्शन केले भुसावळ शहरात स्केटिंग ची प्रॅक्टिस करण्यासाठी तीर्थराजला जय मातृभूमी क्रीडा मंडळ व संतोषीमाता बहुउद्देशीय हॉल यांचे पण खुप सहकार्य लाभले आहे तिर्थराज हा मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्विस चे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष पुरुषोत्तम पाटील यांचा नातू व भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस श्री मंगेश सुभाष पाटील यांचा मुलगा आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!