राज्यस्तरावरील स्केटिंग रेस व रिले मॅच स्पर्धेत तिर्थराज पाटील राज्यात तिसरा
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर आणि रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित करण्यात आली होती.यात तिर्थराज मंगेश पाटील,भुसावळ येणे राज्यात तिसरा नंबर पटकावला.
या राज्यस्तरावरील स्केटिंग रेस स्पर्धेत नागपूर , पुणे, संभाजी नगर, जळगाव, भुसावळ, अमरावती, सांगली, सातारा, अशा अनेक जिल्ह्यांतुन विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर आणि रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित करण्यात आली होती या राज्यस्तरावरील स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर 8 या गटा मध्ये तिर्थराज मंगेश पाटील राज्यात तिसरा नंबर आला त्याला 2 ब्राँझ मेडल मिळाले आहे.
पुढील महिन्यात गोवा येथे होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले आहे* त्याच्या राज्य स्तरीय निवडीमध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चे त्याचे कोच पियुष दाभाडे सर व दीपेश सोनार सर यांची खुप मेहनत आहे असे तिर्थराज पाटील याचे आई व वडिल यांनी सांगितले तिर्थराज पाटील हा भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस श्री मंगेश सुभाष पाटील यांचा मुलगा आहे