भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

भारत आणि पाकिस्तानातील सीझफयारचा आज शेवटचा दिवस, घडणार काय पुढे?

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १२ मे रोजी झालेल्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेत १८ मे पर्यंत युद्धबंदी वाढवण्याचा करार झाला होता का? आज पुन्हा दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये बैठक होणार आहे का?
भारत आणि पाकिस्तानातील सीझफयार अर्थात युद्धविराम आज संपणार आहे का ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं थेट भारतीय सैन्याकडून मिळाली आहेत.

मात्र आज युद्धविराम संपणार? या बाबत स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं आहे. १२ मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले तो शेवटचा संवाद होता. त्यानंतर कोणतीही चर्चा नव्हती किंवा नियोजित नाही.;असं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

१४ मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात हॉटलाइनवर चर्चा झाली, ज्यामध्ये युद्धविराम वाढवण्यासाठी एक करार झाला. ते म्हणाले की, १० मे रोजी पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली, ज्यामध्ये युद्धविराम १२ मे पर्यंत वाढवण्यात आली. १२ मे रोजी पुन्हा चर्चा झाली आणि ती १४ मे पर्यंत वाढवण्यात आली. १४ मे रोजी झालेल्या चर्चेत, युद्धविराम १८ मे पर्यंत वाढवण्याचा करार झाला असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी अलीकडेच सिनेटला सांगितले.

दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला चिथावणीखोरी म्हटले होते. जर हा प्रश्न सोडवला गेला नाही तर ते Act Of War मानले जाऊ शकते असे पाकिस्तानच्या परस्त्रमंत्र्यानी  म्हटले होते. भारत आणि पाकिस्तानमधील दीर्घकाळापासून सुरू असलेला सिंधू पाणी कराराचा वाद सोडवला नाही तर सीझफायर करार धोक्यात येऊ शकतो, असे उपपंतप्रधान इशाक दार यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते

१८ तारखेला भारत पाक मधील युद्धविराम संपणार आणि पुन्हा संघर्षाची शक्यता आहे, अशा बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. मात्र सीझफायरला कोणतीही मुदत दिलेली नव्हती, एक्सपायरी डेट नव्हती असंही भारतीय लष्कराने सांगितलं आहे. त्यामुळे युद्धविराम आज संपणार अशा ज्या चर्चा सुरू आहेत, त्या पूर्णपणे खोट्या असल्याचं लष्कराने स्पष्ट केलं आहे. मात्र १८ मे नंतर काय होणार या कडे कोट्यावधी भारतीयांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!