भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

खिरोदा येथे शाळे समोर पालकाच्या “आमरण उपोषणाचा” आज ८ वा दिवस

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील खिरोदा येथे एका पालकाने आपल्या मागण्यांसाठी विद्यालयासमोर बेमुदत उपोषण दिनांक १५ ऑक्टोबर पासून सुरू केले आहे. त्या उपोषणाचा आज ८ वा दिवस आहे. परंतु या उपोषण स्थळी सावदा पोलिस अधिकाऱ्यांशी शिवाय अद्याप कोणीही भेट दिली नसल्याने आच्चर्य व्यक्त केले जात आहे.

तक्रार कर्ते रावेर तालुक्यातील खिरोदा येथील पालक प्रशांत सुरेश तायडे यांनी म्हटल आहे की, म. मुख्याध्यापिका, धनाजी नाना विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, खिरोदा प्र. यावल, ता. रावेर, जि. जळगांव. यांचेकडे माझ्या मुली इयंत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिकत असून मी प्रत्येक वर्षी शालेय फी भरलेली आहे. तरी मला आजपर्यंत भरलेल्या शालेय फी ची कुठल्याही प्रकारची पावती मिळालेली नाही. या संदर्भात मी जून २०२४ पासून आपल्याला तोंडी स्वरूपात पावतीची मागणी केली. पण त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले, म्हणून मी दि.२२/७/२०२४ रोजी लिखीत स्वरूपात पावतीची मागणी केली. नंतर दि. ३०/७/२०२४, दि.३१/८/२०२४, दिनांक १/१०/२०२४ अशी अनुक्रमे प्रत्येक वेळेला त्यांना स्मरणपत्र देऊन स्मरण करून दिले.

वेळोवेळी स्मरणपत्र दिलेले असताना परंतु त्यांनी माझ्या अर्जाचा कुठल्याही प्रकारे न विचार करता पुर्तता केलेली नाही. म्हणून मी त्यांना दि.१/१०/२०२४ रोजीच्या स्मरणपत्रातच त्यांना सांगितले आहे. मी आपल्या शाळेच्या समोर मी भरलेल्या शालेय फीच्या पावती जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषणास बसेल त्यासंदर्भात मी मुख्याध्यापिका यांनी पावती न दिल्यामुळे माझा संशय बळावतो की, मी दिलेल्या शालेय फी चा यांनी गैरव्यवहार झालेला दिसतो. म्हणून मी नाईलाज मुख्याध्यापिकेच्या कार्यालयासमोर जो पर्यंत मी भरलेल्या शालेय फी च्या पावत्या मिळत नाही. तो पर्यंत दि.१५/१०/२०२४ पासून आमरण उपोषणाला बसत आहे. तरी महाशय यांनी मला योग्य ती कार्यवाही करून परवानगी देण्यात यावी ही नम्र विनंती. पुढील होणाऱ्या परिणामास मुख्याध्यापिका व संस्था चालक जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले असून या निवेदनाच्या प्रती संबंधितांना देण्यात आलेल्या असल्याचे त्यांनी त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात धनाजीनाना विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, खिरोदा या शाळेच्या मुख्याध्यापिका यांचेशी फोन द्वारे संपर्क साधला असता आम्ही फी घेत नसल्याचे सांगितले. त्यांनी फी दिली तर तेव्हाच पावत्या मागायला हव्या होत्या अस मुख्याध्यापिका यांनी “मंडे टु मंडे न्युज” शी बोलताना सांगितले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!