भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

आता ६० km पर्यंत एकच टोल नाका; स्थानिक वाहनधारकांसाठी पास– गडकरींची घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसेवा : आता महामार्गावरुन (Highway) प्रवास करत असताना सरकारकडून एका ठराविक मर्यादेपर्यंतच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ (Toll Plaza) राहणाऱ्या आणि महामार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना पास देण्याची योजना आणणार असल्याचे माहिती आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी लोकसभेत दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय सांगितला. महामार्गावर टोलनाक्यांची संख्या मर्यादित असणार आहे म्हणजेच 60 किलोमीटरच्या आत दुसरा टोल नाका नसावा असा नियम करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महामार्गाजवळ राहणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांना पास देण्यात येणार असून या पासमुळे त्यांच्याकडून टोल वसूल केला जाणार नाही.

केंद्र सरकारची ही योजना तीन महिन्यात लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गावरुन प्रवास करत असताना वसूल करण्यात येत असलेल्या टोल आणि रस्तेविषयक लोकसभेत माहिती देताना हा टोलविषयीचा निर्णय त्यांनी सांगितला.

महत्वाच्या मार्गावर 60 कि. मिटरच्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. साठ किलो मिटरच्या अंतरावर आता एक टोल नाका असणार असून, महामार्गाजवळ राहणाऱ्या वाहनधारकांना पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना सांगितलेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

महामार्गाजवळ राहणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारच्या या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गाजवळ म्हणजेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या व सतत टोल नाक्यावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल घेतला जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!