चिनावल मध्ये २० मे पर्यंत संचारबंदी, ठिय्या आंदोलन आश्वासना नंतर मागे
चिनावल, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील चिनावल गावात शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेकीच्या पाश्र्वभूमीवर गावात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी २० मे २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे.
काल दी.१७ मे रोजी संध्याकाळी किरकोळ वादाचे निमित्त साधून समाजकंटकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात दुचक्यांची तोडफोड करण्यात आली.या वेळी पोलिसांवरही चल करून दगडफेक करण्यात आली आहे.मुद्दामहून जमाव जमऊन विद्दुत पुरवठा बंद केला गेला या मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.सादर घटने मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांच्या जीवित व मालमत्तेस हानी पोहोचण्याची तसेच अप्रिय घटना निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने १९७३ चे कलम १४४(१) अन्वये संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
चीनावल मधील महादेव वाड्याच्या खालील बाजूस किरकोळ बाचाबाची झाली, त्या नंतर महादेव वाडा,महाजन वाडा, व वान गल्लीत तुफान दगडफेक करण्यात आली. दोषींवर कारवाई करण्यात यावी या साठी गावातील शेकडो महिला व पुरुष यांनी चीनावल बस स्थानक परिसरातील पोलिस चौकी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.घटना स्थळी पोलिस दाखल होत शांतता प्रस्थापित करण्याचं प्रयत्न केला. शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक नखाते याच्या,दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. चीनावल गावात प्रशासनाकडून २० मे २०२४ चा रात्री १२ वाजे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोणीही घराबाहेर निघू नये,सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.सदरचा आदेश हा अत्यावश्यक सेवा रुग्णसेवा, पाणीपुरवठा , सार्वजनिक वितरण व्यवस्था,गावातील सरकारी खाजगी बँका याना लागू राहणार नाही.हे सुरळीत सुरू राहतील.असे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी फैजपूर देवयानी यादव यांनी काढले आहेत.