माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ, पती,सासू सह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l ठिबक नळीची कंपनी टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने यावल तालुक्यातील मालोद या गावातील माहेर असलेल्या २३ वर्षीय विवाहितेचा तिचा पतीसह पाच जणांनी छळ केला व दोन लाख रुपये न आणल्याने विवाहितेला माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला विवाहितेच्या फिर्यादीवरून पती व सासू सह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल तालुक्यातील मालोद या गावचे माहेर असलेल्या सुमय्या वसीम तडवी. वय २३ वर्ष. या तरुणीचा विवाह मार्च २०२० मध्ये वडगाव, ता.रावेर येथील रहिवाशी वसीम करीम तडवी याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती वसीम तडवी, दीर शरीफ तडवी, सासू मरियम तडवी, झुबेदा इस्माईल तडवी व अंजुम इस्माईल तडवी या पाच जणांनी विवाहितेच्या पतीला ठिबक नळीची कंपनी टाकायची आहे म्हणून तिने माहेरून दोन लाख रुपये आणावे याकरिता त्रास दिला. शारीरिक आणि मानसिक छळ केला. पैसे न दिल्याने उपाशी पोटी ठेवून तिला माहेरी पाठवून दिले. अशी फिर्याद पिडीत विवाहितेने यावल पोलिस स्टेशनला दिली.
विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला विवाहितेचा पती वसीम तडवी, दीर शरीफ तडवी, सासू मरियम तडवी, झुबेदा इस्माईल तडवी व अंजुम इस्माईल तडवी या पाच जणांविरूध्द विवाहितेचा छळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.