चिनावल येथे अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर जप्त, रावेर तहसीलदार व पथकाची कारवाई
चिनावल, तालुका – रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l रावेर तालुक्यातील चिनावल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक वाळू माफियां करीत असल्याचे वृत्त काल “मंडे टु मंडे न्युज” ने दिले होते. या संदर्भात कालच चिनावल गावातील ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूकीचा तक्रार अर्ज तलाठी सौ.लीना राणे मॅडम यांना दिला होता.
तहसीलदार व त्यांचे टीम ने घेतली ॲक्शन…
कालच चिनावल गावातील ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूकीचा अर्ज तलाठी सौ.लीना राणे मॅडम यांना दिला होता. सदर तक्रार व “मंडे टु मंडे न्युज” च्या वृत्ताची दखल घेत तहसीलदार साहेब यांनी कारवाही करत १ ट्रॅक्टर जप्त करून तहसील ऑफिस ला पाठविले .
बिना नंबरचे ट्रॅक्टर, सुकी नदी पात्रात पुलाच्या खाली ट्रॅक्टर भरत असताना उटखेडा – चीनावल रस्त्या वरील पुला खाली पकडले , ही कारवाई तहसीलदार बंडू कापसे, रावेर तलाठी परदेशी अप्पा , लोहारा तलाठी गुणवंत बारेला, खानापूर तलाठी गोपाल भगत व सावखेडा तलाठी निलेश चौधरी यांचे पथकाने कारवाई केली, ट्रॅक्टर मालक शे. शाहरुख शे, सगीर चिनावल. यांचे ट्रॅक्टर असून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.